आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगा वाद:राज ठाकरेंच्या भुमिकेचे कौतूक करणाऱ्या कालिचरण महाराजांना हनुमान चालीसा पाठ नाही, म्हणाले - मी तर कालिचा उपासक

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. यावर आज सोलापूर दौऱ्यावर असलेल्या कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे चांगले काम करत असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे म्हणत पाठिंबा दर्शवला. तसेच फालतू गोष्टी सगळेच करतात. राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली आहे, असेही ते म्हणाले. जगदंबा देवी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ते सोलापूर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

योगी आदित्यनाथ यांनी जे केले ते भारतभर झाले पाहिजे. मुद्याच्या गोष्टी आहेत त्या फक्त राज ठाकरे करत आहेत, असे ते म्हणाले. तसेच शिवसेना हिंदूवादी भूमिकेवर बॅकफूटावर जात आहे का, या प्रश्नावर बोलताना शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. हे सांगण्याची गरज नाही. ते दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. तर मंदिराना भोंग्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी कालीचरण महाराजाला हनुमान चालीसा म्हणायला सांगितली असता हनुमान चालीसा पाठ नसून आपण तर कालिचा उपासक आहोत, असे त्यांनी म्हटले.

राजा हिंदुत्ववादी असावा -
भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे गुरुजी यांना क्लिन चिट मिळणे हा हिंदूत्वाचा विजय असल्याचे कालिचरण महाराज म्हणाले. राजा हिंदुत्ववादी नसेल तर गोरक्षकावर हल्ले होणार. जो राजा हिंदुंचा विचार करणार नाही. त्याचा धर्मरक्षकांसाठी काहीच उपयोग नाही. जे हिंदुंच्या गोष्टी करतील तेच देशात राज करतील हे लक्षात घ्या, असे कालीचरण महाराज म्हणाले.

कट्टर हिंदूवादी सरकार हवं -

गोरक्षकांची रक्षा करण्यासाठी आणि हिंदूच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कट्टर हिंदूवादी सरकार सत्तेत असायला पाहिजे. गोरक्षा , लव्ह जिहाद बंदीसाठी कायदे व्हावे, यासाठी राजा कट्टर हिंदूवादी असावा. त्यामुळे हिंदू हिताची बात करण्याचे हिंदूचे आद्य कर्तव्य आहे. सडलेला भाषावाद, वर्णवाद, प्रांतवाद सोडवा आणि सनातन हिंदूवाद धरावा. जो हिंदूहितावर बोलेल. त्यालाच मतदान करावे. हिंदूची व्होटबॅक बनवावी, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...