आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रहार संघटनेने कर्नाटक एसटीला फासले काळे:बोम्मईंच्या तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा; सीमावाद चिघळला

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील एसटी बसेस आणि ट्रकवर कर्नाटकात दगडफेक करून वाद निर्माण करणाऱ्या कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटक वेदिका संघटनेचा निषेध करत आज सोलापूर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून कर्नाटक बसला आडवून बसवर शाही फेक करत कर्नाटक एसटीला काळा फासण्याचे काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले तसेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिमेला काळे फासत कर्नाटक सरकारचा ही याप्रसंगी निषेध करण्यात आला.

या आंदोलन प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी आक्रमक होत कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटक वेदिका या संघटनेचा तीव्र शब्दात असा निषेध व्यक्त केला... आज आम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिमेला काळं फासत आहोत येत्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद संपला नाही तर थेट कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा तोंड काळं करू असा इशाराही यावेळी अजित कुलकर्णी यांनी दिला...

यावेळी बोलताना प्रहार जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख म्हणाले की , महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गरीब शेतकरी यांच्यासाठी जी एसटी सेवा देत असते ते एसटी आम्ही फोडणार नाही वेळ पडली तर कर्नाटकातील सरकारी गाड्या तसेच आमदार खासदार मंत्र्यांचे गाड्या प्रहार फोडल्याशिवाय राहणार नाही आणि वेदिका संघटनेने महाराष्ट्राला भीती दाखवण्याचे काम करू नये महाराष्ट्र कधीही झुकत नाही आणि झुकणार नाही महाराष्ट्राने विचार केला तर दिल्लीला झुकवायची ताकद महाराष्ट्राच्या मनगटीत आहे हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावं असे सांगत कर्नाटक सरकारला त्यांनी फैलावर घेतले होते.

याप्रसंगी शहर कार्यकारी प्रमुख खालीद मणियार, शहर उपप्रमुख माजिद पटेल ,करमाळा तालुका प्रमुख संदीप तळेकर, आकीब नाईकवाडी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील वाद वाढत असतानाच सोलापुरातील या घटनेने त्यात आणखी भर पडली. मात्र सीमा भागातील प्रवाशांची मात्र झोप उडाली. कारण सोलापूर आणि सीमेवतील भागातील गावांमध्ये शेतकरी ते मजुरांची नियमित ये- जा असते ती एसटीनेच. आता ही वाहतूक सुरक्षित राहिली नाही, अशा भावनेमुळे खाजगी वाहतुकीकडे ही मंडळी वळतील.

बातम्या आणखी आहेत...