आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराचे वितरण:काशी पीठाचे पुरस्कार जाहीर; गणित प्रज्ञेसाठी आयेशा शेख

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशी ज्ञान सिंहासन, जंगमवाडी मठ वाराणसीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी आठ जणांची निवड करण्यात आली असून ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७. ३० वाजता चिंचवड (पुणे ) येथे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महा स्वामी यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र हिरेमठ यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांनी दिली.

काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे ३२ वे तपो अनुष्ठान पिंपरी चिंचवड येथे सुरू आहे. यात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. २९ ऑगस्ट रोजी अड्डा पालखी मिरवणूक, तपो अनुष्ठान तसेच ३१ ऑगस्ट रोजी अयाचार, शिवदीक्षा होणार आहे. यावेळी शांताच्या स्वामी, बाळासाहेब भोगडे, शशिकांत रामपुरे आदी उपस्थित होते.

औसेकर महाराज यांच्यासह आठ जण ठरले मानकरी
देगलूरकर येथील दौलतपूर साखरे (डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार), परळी येथील चेतना गौर शेटे (वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक), सोलापूर विद्यापीठात गणित विषयात प्रथम येणाऱ्या आयेशा शेख (सदाशिव स्वामी प्रज्ञा), पिंपरी चिंचवड येथील रमाकांत रोडे (बंडय्या मठपती समाजसेवा), कोल्हापूर येथील वसंत सांगवेकर (परंडकर महाराज पत्रकारिता), डॉ. संजीवकुमार पाटील पुणे (सिद्रामप्पा भोगे नाट्यकर्मी), लातूरचे सद्गुरु श्री वहिनीना महाराज औसेकर (शांताबाई व निवृत्ती गायकवाड कीर्तन), पांडुरंग उचित कर वाशीम (विठाबाई देवबाप्पा पसार कर कृतज्ञता) यांना पुरस्कार जाहीर झाले. दहा हजार रोख, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

बातम्या आणखी आहेत...