आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिन्यांची गरज:आचार, विचार, कर्म, वाणी, गुण सुंदर ठेवा;  दागिन्यांची गरज नाही

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार, विचार, कर्म, वाणी आणि गुण सुंदर असतील मनुष्याला दागिन्यांची गरज नाही. सुंदर विचार हाच खरा दागिना असल्याचे प्रखर वक्त्या विपुलदर्शना यांनी येथे सांगितले. सुंदर विचार जीवनाला सुंदरच आकार देतात, असेही त्यांनी नमूद केले. जैन स्थानकवासी संघात सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचनमालेत त्या बाेलत हाेत्या. पुढे म्हणाल्या, ‘‘विचारांना चिंतनाची जोड हवी. विचार जेवढे उच्च तितकेच आचरण, व्यवहार उत्तम हाेईल. जीवन समृद्ध हाेईल.

आज ज्या काही व्याधी आहेत, त्या शारीरिक कमी आणि मानसिकच जादा आहेत. शरीर हे आजाराचे मुख्य कारण नसून विचार हेच मुख्य कारण अाहे. मनात कधीही वाईट विचार येऊ देऊ नका. विचार परिपक्व असतील तर उत्तम कृती सहजतेने घडणार. म्हणूनच गोड बोला, शुभ बोला. काया, वाचा, मनाने कोणालाही दुखवू नका.’

बातम्या आणखी आहेत...