आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:खो खो, कबड्डी खेळाडूंना वार्षिक 100 रुपये शुल्क ; पालिका स्टेडियम समितीचा निर्णय

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्क मैदानावरील स्मार्ट सिटीच्या निधीतून तयार होत असलेल्या खो खो, कबड्डी व व्हॉलीबॉल मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी वार्षिक १०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका स्टेडियम समितीने घेतला आहे. समितीची बैठक पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आमदार विजय देशमुख यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना फोन करून नाममात्र भाडे आकारणी करा, अशी सूचना केली होती.

मैदानांच्या भाडे आकारणीस जिल्हा क्रीडा महासंघ आणि संबंधित जिल्हा संघटनांनी विराेध दर्शवला हाेता. शुक्रवारी सकाळी जिल्हा क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय देशमुख यांच्यासमाेर गाऱ्हाणे मांडले हाेते. बैठकीत खेळाडूंचे प्रतिनिधी हाजीमलंग नदाफ यांनी भाडे आकारणी करू नये, अशी मागणी केली. जिल्हा असोसिएशनच्या स्पर्धेसाठी ही मैदाने विनाशुल्क वापरण्यास संमती देण्यात आली. वाढदिवसानिमित्तच्या स्पर्धेस प्रतिदिन १ हजार रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...