आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवा ध्वज आणि तिरंगा‎ फडकवला:मराठी युवकांची किलीमांजरो मोहीम फत्ते‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफ्रिकेतील टांझानिया येथील‎ सर्वोच्च किलीमांजरो शिखर‎ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील‎ १९ युवकांनी सर केलय. येथे २५ फूट‎ लांबीचा भगवा ध्वज आणि तिरंगा‎ फडकवला. रायरेश्वर किल्ल्यातील‎ सात रंगाची मातीही या मोहिमेत‎ युवकांनी आपल्या सोबत नेली‎ होती. छत्रपती शिवाजी महाराजांची‎ मूर्ती शिखरावर नेऊन जयंती साजरी‎ केली. शिवजयंती दिवशीच ही‎ मोहीम फत्ते झाली. नाशिक येथील‎ अंध गिर्यारोहक सागर बोडके,‎ सांगलीचा तुषार सुभेदार,‎ साताऱ्याचा समीर मालुसरे,‎ नागपूरचा सागर कुंभारे,‎ अमरावतीचा सुबोध वरघट हे‎ मोहिमेत सहभागी होते.‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सागर बोडके, तुषार सुभेदार,‎ समीर मालुसरे यांनी शिखर सर‎ केले. सुबोध वरघट व सागर बोडके‎ यांनी शिखराच्या कीबोपर्यंत उंची‎ गाठली. सांगली येथील तरुण‎ गिर्यारोहक तुषार सुभेदार याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ छत्रपती शिवाजी महाराजांनी‎ स्वराज स्थापनेची शपथ घेतलेल्या‎ रायरेश्वर किल्ल्यावरील सात‎ रंगाची माती आफ्रिकेच्या सर्वोच्च‎ शिखरावर नेऊन महाराजांना‎ अनोखे वंदन केले.‎आफ्रिका खंडातील किलीमांजारो शिखर मोहीम‎ यशस्वी करण्यात आली.‎अंध गिर्यारोहकाने‎ शिखर गाठले‎ अंध गिर्यारोहक सागर‎ बोडके याने १७ हजार‎ ४२१ फुटांपर्यंत चढाई‎ करून सर्वांना‎ आश्चर्याचा सुखद‎ धक्का दिला. ३६०‎ एक्सप्लोरर संस्थेच्या‎ मार्गदर्शनाखाली त्यांनी‎ या चढाई चे आव्हान पूर्ण‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...