आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Kirit Somayya । Ajit Pawar । Jarandeshwar Sugar Factory: Case Did Ajit Pawar Cheat 12.5 Crore People In Maharashtra Or His Sister?, BJP Leader Kirit Somaiya's Direct Challenge To Pawar Family

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण:अजित पवारांनी महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणीशी? भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पवार कुटुंबियांना थेट आव्हान

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2010 साली संजय राऊत यांनी देखील अशाच पद्धतीने 55 लाख रुपये घेतले होते.

नेहमी चर्चेत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कुटुंबियांना देखील सोमय्या यांनी थेट आव्हान दिले आहे. ते आज सोलापूरात बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणीशी? असा थेट सवाल सोमय्या यांनी पवारांना विचारला आहे.

'अजित पवार आणि मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडली, असे पवार म्हणतात. मी पवारांना विचारतो की, शिवालिक व्हेन्चर्स लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण काय आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? अजित पवारांच्या नावाने त्या संबंधीत कंपनीत एन्ट्री केलेली आहे. भविष्यात कधी अजित पवार आपल्या जमिनी विकणार, त्याचा अनसिक्योर अॅडव्हान्स हे 2008 च्या बुकमध्ये एन्ट्री झाली. परंतू त्यावर लिहिण्यात आले की यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. 100 कोटीची ती प्रॉपर्टी आज बाराशे कोटीची झाली आहे. त्यातील एक दमडी परत दिली का?’ असा थेट प्रश्न सोमय्यांनी विचारला आहे.

2010 साली संजय राऊत यांनी देखील अशाच पद्धतीने 55 लाख रुपये घेतले होते. मात्र ईडीने शोध घेतल्यानंतर संजय राऊतांनी मागच्या दाराने ईडीचा माल परत केला. अजित पवार चोरीचा माल परत करणार का? आपण सांगता की दोन बिल्डरकडून पैसे मिळाले. ते दोन बिल्डर अजित पवारांचे पार्टनर आहेत का? अजित पवारांनी आयकर विभागाडी धाड सुरु झाल्यावर पहिल्या दिवशी विधान केले की, माझ्या बहिणी निता पाटील, विजया पाटील, मेहुणे मोहन पाटील यांच्या घरी धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाही. असे शरद पवार म्हणाले होते.

माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत की जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवारांच्या 70 बेनामी संपत्तीत, त्या कंपनीत अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे पार्टनर आहेत. मग अजित पवार तुम्ही बेईमानी महाराष्ट्रातील जनतेशी केली की, बेईमानी आपल्या बहिणीशी केली? बहिणीच्या नावे संपत्ती, पार्टनशिप, कंपन्या आहेत. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही, मग बहिणींच्या नावाने पण बेईमानी केली? ते शरद पवार यांना मान्य आहे का?

मी शरद पवारांना आव्हान देतो की, मी ही सगळी कागदपत्रे ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार खात्यालाही पाठवणार. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. यातील एक जरी कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी सिद्ध करुन दाखवावे" असे थेट आव्हान किरीट सोमय्यांनी पवार कुटुंबियांना दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...