आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे उद्या ३ जानेवारीला बालिका दिन साजरा होत आहे. पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी प्रशालेत एक दिवसीय किशोरी हितगुज मेळावा होत आहे. यामध्ये ७०० जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा सहभाग असणार आहे.
मुलींचे शिक्षण व त्यांचा समाजातील सहभाग वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन सकाळी १० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सकाळच्या सत्रात योगासने व त्याची प्रात्यक्षिके, गीतमंच विद्यार्थिनींसाठी अल्पोपहार, कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती, त्याचबरोबर लिंगसमभाव, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता व आरोग्यविषयी माहिती, मुलींसाठी शैक्षणिक सुविधांची माहिती ,कथाकथन व काव्यवाचन, बेटी बचाव बेटी पढाव व स्वच्छ विद्यालय स्वच्छ भारत पोस्टर प्रदर्शन, विविध स्पर्धा यामध्ये क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आणि विद्यार्थिनींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, हरीश राऊत, सुहास गुरव, अताहर दफेदार, डी. शेख, रतीलाल भुसे यांनी कळवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.