आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:ज्ञानाने सुसंस्कारित पिढ्याघडतील अन् सशक्त राष्ट्रनिर्मितीही होईल; आयुक्त पी. शिवशंकर यांचे आवाहन

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेदाचार्य मोरेश्वर घैसास यांचे प्रतिपादन
आध्यात्मिक ज्ञानाने सुसंस्कारित पिढ्या घडतील. त्याने सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल, अशी अपेक्षा पुण्याचे वेदाचार्य मोरेश्वर घैसास यांनी येथे व्यक्त केली. पद्मशाली हेरिटेजच्या वतीने श्री मार्कंडेय चरित्रावर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील यशवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन रविवारी गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

२७ फेब्रुवारीला ही परीक्षा झाली. ३ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांचा गौरव करण्यासाठी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या विणकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रवचनकार जयंतराव फडके अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार हरिष केंची यांची उपस्थिती होती.

श्री. मार्कंडेय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सहसचिव संगीता इंदापुरे यांनी स्वागत केले. हेरिटेजचे अध्यक्ष प्रवीण पोटाबत्ती यांनी प्रास्ताविक केले. या वेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष हरिबाबू येले, ज्येष्ठ उद्योगपती मुरलीधर अरकाल, वीरेंद्र बोलाबत्तीन, चंद्रकांत इंजामुरी, भास्कर अरकाल, शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुरेश बिटला, अॅड. श्रीनिवास कटकूर, श्रीनिवास इप्पाकायल, विष्णू शास्री जिल्ला, अंबादास अमृतम उपस्थित होते. प्रा. रजनी दळवी यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत इंदापुरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...