आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय वृत्त:कुंभारीत काँग्रेसचे महागाईच्या विरोधात आंदोलन,  केंद्रातील सरकारवर टीका

दक्षिण सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षाचे वरिष्ठ जिल्हाउपाध्यक्ष सुरेश हसापुरे व तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत गेनसिध्द मंदिरासमोर हे आंदोलन झाले. यावेळी केंद्र सरकारवर टीरा करण्यात आली. यावेळी यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष भीमाशंकर जमादार, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे, जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे, संघटक रमेश हसापुरे, जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, अल्लाउद्दीन शेख, मलेशी बिडवे, अप्पासाहेब बिराजदार, सोमशंकर करजोळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे, रोहित बिराजदार, अनंत म्हेत्रे, अप्पू शेख, दत्ता पवार, साजिद मकानदार, भुताळी कळकीळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष हरीश पाटील म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याचे काम केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करीत आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेऊन त्यांना अडचणीत आणणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो. वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...