आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय इच्छाशक्ती आणि अधिकाऱ्यांच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे कुर्डुवाडीतील अनेक प्रकल्प इतरत्र हलविले जात आहेत. साखर कारखाने वगळता इतर मोठे उद्योग नव्याने आले नाहीत. परंतु शहरात असलेले छोटे-मोठे उद्योग, कार्यालये दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आल्याने शहर आणि परिसरातील युवकामध्ये बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुर्डुवाडी शहरातील रेल्वे कोच प्रकल्पात नेरळ माथेरान रेल्वे डब्यांचे कोच तयार केले जातात. नॅरोगेजची सर्व कामे केली जातात. दोन्ही कामे परेल रेल्वे कारखान्याला स्थलांतरित करण्याचे आदेश कुर्डुवाडी रेल्वे कारखान्याला आले आहेत. सुमारे १११ कुशल कर्मचाऱ्यांची लातुर मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये बदली करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. असे जर झाले तर भविष्यात फॅक्टरी ॲक्ट लागू करून हा कारखाना कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला जाण्याची शक्यता कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
यामुळे येथील कारखान्याचे पुढील भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कुर्डुवाडी शहर रेल्वेवरच आधारलेले आहे. रेल्वे प्रकल्प हा येथील बाजारपेठेचा आर्थिक कणा आहे. ज्या कारखान्यात २ हजार कर्मचारी होते आता केवळ ३०० कर्मचारी उरले आहेत.
अशा बदलाची शक्यता
परेल, बडनेरा व कुर्डुवाडी येथील एकूण ४२७ कर्मचारी मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. त्यापैकी कुर्डुवाडीतील १११ पोस्ट सिनिअर सेक्शन इंजिनिअर ४, टेक्निशियन १०० व असि. वर्कशाॅपच्या ७ पोस्ट मराठवाडा कोच फॅक्टरीसाठी वर्ग करण्यात येणार आहेत.
कारखाना शहराचा ठेवा
रेल्वे हा कुर्डुवाडी शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी असून सर्वांनी गट-तट विसरून गावासाठी पुन्हा एकदा एकजूट होऊन लढा उभारण्याची गरज आहे. - महेंद्र जगताप, अध्यक्ष : एससी एसटी असोसिएशन रे. का. कुर्डुवाडी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.