आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांवर गुन्हा नोंद:आश्रम शाळेच्या आवारात लघुशंका; येड्राव येथे तलवारीने हल्ला

मंगळवेढाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येड्राव येथील आश्रम शाळेच्या आवारात लघुशंकेला बसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी अशिष संभाजी काळे, नम्रता आशिष काळे, सखुबाई संभाजी काळे या तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी रोजी सकाळी १० वाजता आश्रमशाळेच्या आवारात घडली आहे.

फिर्यादी कुमार बजरंग राक्षे यांचे मामा मारुती वाघमारे यांच्याबरोबर संशयित आरोपी आशिष काळेचे पैशाच्या कारणावरून यापूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून राग मनात धरून आरोपी हा शिवीगाळी, दमदाटी करीत होता. रविवारी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ आश्रमशाळेच्या आवारात लघुशंकेसाठी गेले होते. आरोपीने त्या ठिकाणी हातात काठी घेऊन येऊन तु लघुशंकेला येथे का बसला? अशी विचारणा करीत शिवीगाळ करू लागला. यावेळी फिर्यादीने तू भांडण का करीत आहे? अशी विचारणा केली. हातातील काठीने पाठीत, डोकीत दोघांना मारहाण केली. आरोपीने फिर्यादीच्या मामाच्या घरी घुसून टीव्ही कपाट, फ्रिज यांची मोडतोड केली.

बातम्या आणखी आहेत...