आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:लक्ष्मी मार्केट : ओट्यांचा सोमवारीलिलाव, नंतर अतिक्रमण काढणार; जप्त केलेल्या खुल्या जागेचे 27 मे रोजी लिलाव

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी पाच पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात असलेल्या लक्ष्मी मार्केट येथील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. त्यापूर्वी तेथील ओट्यांचा लिलाव सोमवारी करण्यात येणार आहे. महापालिकेने जप्त केलेल्या खुल्या जागेचा लिलाव २७ मे रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदाबस्त नसल्याने पालिकेस अडचण येत होती. पाच पोलिस देेण्यात आले. त्यामुळे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. चार पुतळा परिसरातील अतिक्रमण काढण्यात येत आहे. लक्ष्मी मार्केट येथील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. शुक्रवारी महापालिकेने पथकाने तेथे कारवाई केली. तेथील ओट्याचा लिलाव सोमवारी करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथील अतिक्रमण काढण्यात येईल.

मिळकतकरांच्या थकबाकीपोटी कुमठे, सोरेगाव येथील खुल्या जागा महापालिकेने जप्त केले. त्यानंतर जागा मालकास कर भरण्यासाठी संधी देण्यात आली. तरीही कर न भरल्यास सुमारे दहा जागेचा लिलाव २७ मे राेजी करण्यात येणार आहे. त्या जागेचा दर रेडीरेकनर दरानुसार आहे. मिळालेल्या रक्कमेतून पालिका कर दंडासह वसूल करून अन्य रक्कम जागा मालकास देईल. तीन वेळा लिलाव करून त्यास प्रतिसाद नाही मिळाल्यास त्यानंतर १ रुपयाने पालिका त्या जागा ताब्यात घेणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

मालमत्ता जप्त करणार मिळकत करापोटी महापालिका यापुढे शहरातील मिळकती जप्त करणार आहे. त्या इमारतीचे मूल्यांकन करून त्याची लिलाव प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...