आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:मंगळवेढ्यातील घरफोडीत 2 लाख 22 हजारांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांनी मित्रनगर परिसरातील फोडला बंगला

मंगळवेढा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराजवळच्या मित्र नगर परिसरात अज्ञात चोरट्याने घर फोडून २ लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने व बचत गटाची रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

१० ते २० जूनदरम्यान हा प्रकार घडल्याची फिर्याद रमाकांत सावळे यानी दिली. फिर्यादी १० जूनला रात्री ८ वाजता बंगल्याला कुलूप लावून बहिणीकडे मुंबईला गेले होते. २० जूनला सकाळी साडेनऊला घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट उचकटून ४८ हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे गंठण, २८ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची बोरमाळ, २३ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे मणी, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाची नथ, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा आणि ९ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच चोर सापडतील, असे सांगण्यात आले. तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...