आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकोट तालुक्यातून सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडोर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या शेती गटाच्या मोजणीस मंगळवार, दि. १४ जूनपासून सुरुवात करण्यात आली. ५ जुलै रोजी मोजणी प्रक्रिया संपणार आहे. तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भूसंपादनचे अधिकारी अपर्णा कांबळे, नॅशनल हायवेचे अधिकारी सुहास चिटणीस, नियंत्रण अधिकारी तथा सोलापूरचे तहसीलदार डॉ, अभिजित जाधव, अक्कलकोट तालुका भूमिअभिलेख उपअधीक्षक शलैंद्र शिंगणे, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल कृषी विभागाचे प्रतिनिधी, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. यामुळे ठरवून दिलेल्या तारखेला संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात हजर राहिल्यास भूसंपादन होणारे शेत जमिनीचे क्षेत्र कळणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडोर रस्त्याच्या बाबतीत अक्कलकोट तालुक्यातील कोट्यवधीच्या गप्पा गावागावांत रंगत आहेत. यामुळे एरवी दोन लाख रुपये एका एकराची किंमत न मोजणारे माणसं आता दर एकरी वीस लाखांपेक्षा अधिक बोली सुरू झाली आहे. एकंदरीत जमिनीची किंमत गगनाला भिडली आहे. दि.१४ जून-२२ पासून भूसंपादनसाठी जमिनीचे मोजणीला प्रारंभ होत आहे. तालुक्यातील १६ गावातील खासगी गट संख्या ९२ आहेत. याचे क्षेत्र शंभर हेक्टरपेक्षा अधिक आहे. त्याबरोबर सरकारी जमीन संख्या ७ असून त्याचे क्षेत्र ४.१. हेक्टर आहे. मोजणी ५ जुलैपर्यंत चालेल.
सोळा गावांमध्ये ९२ शेतजमिनीचे भूसंपादन अक्कलकोट तालुक्यातील १६ गावात सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडोर महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. ९२ शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे. खासगी व सरकारी मिळून जवळपास शंभर हेक्टर जमिनी मोजणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष मोजणी होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.