आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक‎:लॅपटाॅप, कार गिफ्ट लागल्याचे‎ सांगत 1 लाखाची फसवणूक‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीकडून लॅपटॉप बक्षीस लागल्याचे सांगून पैसे‎ घेतले. नंतर महिंद्रा एक्सयूव्ही, मग टाटा सफारी‎ कार गिफ्ट लागल्याचे सांगत सर्विस टॅक्स,‎ जीएसटी, पेट्रोसाठी तब्बल एक लाख ९ हजार‎ रुपयांची आॅनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी‎ जिया शर्मा, प्रकाश शर्मा, अभिषेक मंडल,‎ श्यामकुमार आणि आलोक (पूर्ण नाव व पत्ते‎ नाहीत) या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

खुर्शीद दस्तगीर मालदार (वय ३८, रा. मोदीखाना)‎ यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली. २५ जून‎ २०२१ पासून हा प्रकार घडला. लॅपटॉपच्या‎ जीएसटीपोटी ६५ हजार घेतले. दोघांनी महिंद्र‎ एक्सयूव्ही लागल्याचे सांगून ३२ हजार ९०० रुपये‎ घेतले. पुन्हा काही दिवसांनी टाटा सफारी कार गिफ्ट‎ लागल्याचे सांगून ११ हजार ७२५ रुपये घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...