आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांना सुप्त शक्ती:दिव्यांग व्यक्तींकडे सुप्त शक्ती : जाधव

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वराने दिव्यांगांना एक अधिकची सुप्त शक्ती दिली आहे. विकलांग असूनही विश्वसिद्धांत मांडून विविध प्रबंधाचे जनक असणारे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्ग आणि रेल्वे अपघातात पाय गमावूनही कृत्रिम पाय लावून एव्हरेस्ट सर करणारी अरूणीमा सिन्हा यांनी विकलांगतेवर मात करीत असामान्य कामगिरी केली, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी केले.

रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात गणेशपूजनानिमित्त ते बोलत होते. मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविक केले. सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते सत्कार झाला. दौलत सीताफळे, जान्हवी माखिजा, धनश्री केळकर, पिटाळकर, चंदनशिवे उपस्थित होते. सूत्रसंचालन विशेष शिक्षिका रेणुका पसपुले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...