आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना शिकवला धडा:​​​​​​​लातुरमध्ये आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला, वयस्करांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली रक्कम

लातूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई-वडिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली रक्कम

आई-वडील आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सर्व काही पणाला लावत असतात. स्वतः उपाशी झोपतात पण आपल्या मुलांना आई-वडील कधीच उपाशी झोपू देत नाहीत. मात्र हेच मुलं जेव्हा मोठे होतात, तेव्हा ते म्हाताऱ्या आई-वडिलांना सोडून देतात. अशा मुलांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्हा परिषदेने एक मोठे उदाहरण समोर ठेवले आहे. जे आपल्या आई-वडिलांसोबत राहत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांचे परिषदेने 30 टक्के पगार कापले आहेत.

जिल्हा परिषदांनी अशा 7 कर्मचाऱ्यांचे 30 टक्के वेतन कापण्यास सुरुवात केली आहे. लातुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, 12 कर्मचाऱ्यांविरोधात आई-वडिलांची उपेक्षा, दुर्लक्ष करण्याची तक्रार मिळाली होती. यामध्ये 6 कर्मचारी हे शिक्षक आहेत.

आई-वडिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली रक्कम
राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, कापण्यात आलेली रक्कम या कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या महासभेने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन 30 टक्के कापण्याचा एक प्रस्ताव पारित केला होता. बोंद्रे यांनी सांगितले की, दोषी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनामधून डिसेंबर 2020 पासून पैसे कापण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...