आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी कंपनीची नियुक्ती:लातूरची मराठवाडा काेच फॅक्टरी खासगी कंपनी चालवणार

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे मंत्रालयाकडून लातूर येथे उभारण्यात आलेल्या कोच निर्मितीची फॅक्टरी चालवण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे बोर्डाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती, यातून कंपनीचीही निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मार्चपासून कंपनीकडून रेल्वे फॅक्टरीतून डबे निर्मिती केली जाणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली. यास रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

मराठवाडा कोच फॅक्टरी आता रेल्वे डबे निर्मितीसाठी पूर्णपणे तयार आहे. तीन दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. डबे निर्मितीसाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत झाला आहे. त्याबाबत कंत्राटदार कंपनीही निवडण्यात आली आहे. याबाबत आवश्यक त्या प्रक्रिया रेल्वे विभागाकडून पूर्ण केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

मेट्रो डब्यांची बांधणी करण्याचे नियोजन लातूरस्थित रेल्वे कारखान्यासाठी आत्तापर्यंत सहाशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. मराठवाडा कोच फॅक्टरीसाठी फेब्रुवारी २०१८ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. एप्रिल २०१९ मध्ये भूमिपूजन तर नोव्हेंबर मध्ये बांधकाम सुरू झाले. तीन टप्प्यातला पहिला प्रकल्प २५ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाला. कोच फॅक्टरीतून मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट तयार करण्याचे नियोजन आहे. मेट्रो डब्यांचीदेखील बांधणी करण्याचे नियोजन आहे.

बातम्या आणखी आहेत...