आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:लऊळचे सत्यवान पुण्यात हरवले, पाकिस्तानात सापडले; भारतात परतूनही तीन महिन्यांपासून कुटुंबियांशी भेट नाही

माढा(सोलापूर)2 वर्षांपूर्वीलेखक: संदीप शिंदे
  • कॉपी लिंक
  • सत्यवान भोंग 2013 मध्ये पुण्यातून अचानक बेपत्ता झाले होते

पाकिस्तानाच्या तावडीतून सुटका करुन भारताच्या ताब्यात देऊन तीन महिने लोटुन गेले असताना देखील माढा तालुक्यातील लऊळ गावचे 43 वर्षीय सत्यवान निवृत्ती भोंग हे शेतकरी कुटुंबिंयाच्या भेटीपासून दूरच राहिले आहेत. सरकारी अनास्था कशी असते, हे या निमित्ताने समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्मदास साखर कारखान्याच्या जवळ लऊळ गावच्या हद्दीत वास्तव्यास असलेले शेतकरी भोंग हे शेतीवर उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे 2005 साली लग्न झाले होते. सत्यवान हे पत्नी मुले, भावंड आणि आईसह राहत होते. लग्नानंतर घरात वादविवाद होऊ लागल्याने सत्यवान यांना कुटूंबातुन विभक्त होण्याची वेळ आली. घरातील वादामुळे सत्यवान यांचे मानसिक आरोग्य बिघडले. यानंतर त्यांची पत्नी पल्लवी यांनी 2013 मध्ये त्यांना उपचारासाठी पुण्यात आणले. येथून एके दिवशी अचानक ते बेपत्ता झाले. कुटुंबियांनी त्यांना बऱ्याच ठिकाणी शोधले पण, ते सापडले नाहीत. अखेर, कुटुंबियांनी सत्यवान यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दिली.

त्यांच्या बेपत्ता होण्याच्या 7 वर्षानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात सत्यवान यांची विचारणा करण्यात आली होती. यानंतर, पोलिसांनी सत्यवान यांची माहिती व खात्री पटवण्यासाठी कुटूबिंयाना बोलावले. यानंतर कुटुंबियांना सत्यवान हे पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर, पाकिस्तान प्रशासाने सत्यवान यांच्या शाळेचा दाखला, बँक पासबुक, सातबारा उतारा, मतदान ओळखपत्र अशा कागदपत्रांची शहानिशा करुन सत्यवानची सुटका करुन त्यांना भारताच्या स्वाधिन केले. आता भारतात येऊन सत्यवान यांना जवळपास तीन महिने लोटुन गेले असतानाही सत्यवान यांना अमृतसरमध्येच ठेवण्यात आले आहे.

यालाच म्हणतात सरकारी अनास्था

सत्यवानच्या आईसह त्यांचे कुटुंबियदेखील सत्यवान कधी माघारी येणार याच विवंचनेत आहेत. सत्यवान पुण्यातुन पाकिस्तान मध्ये गेलेच कसे? याचा उलगडा सत्यवान गावी पोहचल्यावरच पोलिसांच्या चौकशीतुन लागणार आहे. कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे एक अधिकारी,दोन कर्मचारी, एक नातेवाईक असे चौघे जण शनिवारी अमृतसरला सत्यवानला आणण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...