आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका दृश्याची कल्पना करा, घरातील मुख्य हाॅलमध्ये वडील बसून वर्तमानपत्र वाचत आहेत. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाच्या हातात कागद आहे, तो गंभीर होऊन वडिलांकडे जातो. तसे वडिलांना वर्तमानपत्र वाचताना कोणी बोललेले आवडत नव्हते. मात्र मुलगा अधिकार असल्याच्या टोनमध्ये बोलतो, बाबा, तुमच्या एका मतासाठी माझ्याकडे वाईट बातमी आहे. वडील त्याच्याकडे पाहत विचार करतात, मी कधी मतदान केले?
मुलगा पुढे बोलू लागतो, आज तुम्ही दोन पायऱ्या खाली घसरलात. तुमच्या भविष्याच्या ऑफिससाठी गोष्टी गंभीर दिसत आहेत. आता वडील वर्तमानपत्र वाचता-वाचता म्हणतात, असं आहे? माझे मत चांगलं होण्यासाठी काही सल्ला आहे का ? मुलगा सल्ला देण्याच्या टोनमध्ये म्हणतो. ‘परिस्थिती सुधरू शकते, जर तुम्ही नाताळ-नव्या वर्षात मला १० दिवसांच्या सुटीत एखाद्या बर्फाच्या ठिकाणी घेऊ जा.’ वडील स्मार्ट मुलाचा खेळ समजून गेले व हळूच म्हणाले, ‘ओके, मी लक्षात ठेवेन. आता तू तयार होऊन शाळेत जा. सुटी लागायला आणखी वेळ आहे. सध्या तरी देशात कुठेच बर्फ नाही. मुलगा आनंदी हाेतो आणि म्हणतो, ‘मला आशा आहे, तुम्ही वर्तमानपत्रातील “मदत उपलब्ध’ विभाग वाचत असाल व निघून जातो.
मुलगा बाहेर जाताच, वडील दरवाजाकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर परस्पर उलटे भाव दिसून येतात. भुवया उंचावत म्हणतात, तू मला घरातील पाळीव प्राणी व बागेची काळजी घेण्यासाठी मदत घेण्याचा सल्ला देतोय का?’ ते अभिमानाने म्हणतात, ‘किती हुशार मुलगा आहे!’ या दृश्याने तुमच्या चेहऱ्यावर हसू आले का? आपलाही मुलगा असाच स्मार्ट असावा व त्यानी असेच बोलावे, असे तुम्हाला वाटले का? आपला मुलगा असेच काही तरी बोलेल, अशी तुम्ही कल्पना करत आहात का? तसे असल्यास, सर्वात आधी त्याने वडिलांना वाईट बातमीतून घाबरवले व घरातील प्रमुख असलेल्या वडिलांच्या मानसशास्त्राशी खेळला व त्यांना समाधान विचारण्यासाठी मजबूर केले व हळूच सुटीची मागितली. शिवाय, वर्तमानपत्रात काय असते हे त्याला माहीत आहे व त्यानुसार सुट्टीवर गेल्यावर घराच्या देखभालासाठी तात्पुरती मदत घेण्याचा सल्ला देतो. ही कथा ‘कॅल्विन अँड हॉब्ज’ या कार्टूनमधून घेतली असली तरी इतके असामान्य मूल कोणाला आवडणार नाही.
या मंगळवारी सकाळी मला जेव्हा कळाले, महाराष्ट्र सरकार राज्यात १४,९८५ शाळा बंद करणार आहेत, कारण तेथे २० पेक्षा कमी मुले आहेत. तेव्हा मला ही कथा आठवली. प्रत्येक क्षेत्रातून टीका झाल्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करून निर्णय उलटविण्याचा प्रयत्न केला. मात्र आधीच गुपचूप अनेक शाळा बंद करण्यात आल्या. कारण तेथे लोकांनी विरोध केला नाही. देशातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये एकच शाळा आहे. तेथे काय होईल याची कल्पना करा, जेव्हा मुलांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्याऐवजी, कमी पटसंख्या असल्याचे कारण देत सरकार शाळा बंद करत आहे. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.