आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:वकिलांना कायदेविषयक धडे; बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, सोलापूर बार असोसिएशनतर्फे आयोजन

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित वकिलांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी यांच्या हस्ते व बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वकिली व्यवसायात पदार्पण केलेल्या नवोदित वकिलांना कायदेविषयक प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा व सोलापूर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. श्री. एस. ए. ए. आर. औटी व बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांच्या हस्ते तर बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद घाटगे, सदस्य अ‍ॅड. गजानन चव्हाण व सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नीलेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सूत्रसंचालन अ‍ॅड. रितेश थोबडे व अ‍ॅड. गणेश पवार यांनी केले. कार्यक्रमास बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. अविनाश बिराजदार, खजिनदार अ‍ॅड. चंद्रसेन गायकवाड व जिल्ह्यातील सुमारे ४०० नवोदित वकिलांची उपस्थिती होती.

नैतिकता, न्याय निवाड्यांची उजळणी
जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी यांनी नवोदित वकिलांकरता कायदेविषयक प्रशिक्षण ही काळाची गरज असून बार कौन्सिलने कार्यशाळेचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले. कार्यशाळेचे मुख्य आयोजक अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी नवोदित वकिलांनी त्यांचे दैनंदिन व्यवसायात जपावयाची नैतिकता, न्याय निवाड्यांची व कायद्याची अद्ययावत माहिती व अभ्यास केल्याशिवाय सक्षम वकील बनता येत नाही. त्यासाठी आवश्यक न्यायबाबींची सखोल माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...