आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवसांनी बिबट्याच्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट:कराड तालुक्यातील घटना; ऊसतोड मजुरांना मिळाले होते पिल्ले

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साताऱ्यातील कराड तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवण्यात वन विभागाला यश मिळाले आहे. 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ही पिल्ले आईच्या कुशीत विसवली.

वनवासमाची (ता. कराड, सातारा ) येथे सोमवारी (दि 21) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मौजे वनवासमाची येथील जयवंत यादव यांच्या माळ नावाच्या शिवारात शेतातील ऊसतोड सुरु असताना, ऊसतोड मजूरांना अचानक 3 बिबट्याची पिल्ले निदर्शनास आली. त्यानंतर सदर मजूरांनी त्याची माहिती गावातील शेतकरी, ग्रामस्थांना दिली. काही ग्रामस्थांनी सदरची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून बिबट्याच्या पिल्लाना ताब्यात घेवून परिसराची पाहणी करुन ग्रामस्थांना सदर ठिकाणी कोणीही थांबू नये अशा सुचना दिल्या.

त्यांनतर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टिम यांनी त्या पिल्लाना सायंकाळी सात वाजता त्या ठिकाणी क्रेटमध्ये ऊसाची पाचट ठेवून त्यावरती सदरची पिल्ले ठेवली. त्याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. मंगळवारी (दि.22) च्या पहाटे 03.00 च्या सुमारास बिबट्याची ती मादी पिल्लाच्या शोधात आली. त्यापैकी एक पिल्लू घेवून गेली. उर्वरित दोन पिल्ले ताब्यात घेवून सुरक्षितरित्या व सुस्थितीत ठेवली.

त्यानंतर पुन्हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर पिल्लाना क्रेटमध्ये ऊसाची पाचट ठेवून त्यावरती पिल्ले ठेवली असता त्यामधील एक पिल्लू सायंकाळी 06.30 च्या सुमारास व दुसरे पिल्लू बुधवारी पहाटे च्या पहाटे तीनच्या दरम्यान मादी घेवून गेली. अशा रितीने एकूण तिन्ही पिल्लाची आईसोबत पुन्हा पुनः भेट घडवून आणली.

सदर उपक्रममध्ये महादेव मोहिते उपवनसंरक्षक सातारा महेश झांजुणे, सहा. वनसंरक्षक (वनी व कॅम्पा ) सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार नवले, वनक्षेत्रपाल कराड, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे रोहन, रेस्क्यू टिमचे श्रीनाथ चव्हाण, हर्षद, डॉ. कल्याणी, सागर कुंभार वनपाल वराडे, वनरक्षक दिपाली अवघडे, अरविंद जाधव, सचिन खंडागळे, अभिजीत शेळके, अनिल, शंभूराज माने, योगेश बडेकर, हणमंत मिठारे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.

बातम्या आणखी आहेत...