आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Lessons From Expert Instructors At Mamta Vidyalaya; Language Knowledge Imparted To Deaf And Dumb Students Through Sign Language| Marathi News

कार्यशाळा:ममता विद्यालयात तज्ञ प्रशिक्षकांकडून धडे; सांकेतिक चिन्हांतून मूकबधिर विद्यार्थ्यांना दिले भाषेचे ज्ञान

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई म्हणजे बोटांनी आपल्या नाकाकडे केली जाणारी नथ अशी खुण, तर बाबा म्हणजे ओठावर बोट फिरवून दाखवली जाणारी मिशी. पाऊस म्हणजे बोटांची हालचाल अशा अनेक शब्दांची चिन्हं सांकेतिक भाषेतून सांगत शिक्षकांनी मूकबधिर मुलांना आत्मविश्वासाचे नवे शस्त्र दिले. निमित्त होते मूकबधिर मुलांच्या सांकेतिक भाषेच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत ममता मूकबधिर विद्यालयातील मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती वाचा व भाषा विकासासाठी गुरुवारी पुनर्वसन कार्यशाळेचे व सांकेतिक भाषा प्रशिक्षणाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या दिवसभराच्या कार्यशाळेत सांकेतिक भाषा प्रशिक्षक श्वेता आवळे आणि अनिकेत तामचीकर यांनी लेखन वाचन व अबॅकस गणिताचे प्रशिक्षण मुलांना दिले. यात ७० मुलांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेश गुरुबानी, मुख्याध्यापक शशी यलगुलवार आणि संस्थेचे प्रमुख प्रकाश यलगुलवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते.

मुलांनी लुटला आनंद
आईला काय म्हणायचे किंवा तिला कशा पद्धतीने बोलवायचे याची खुण, बाबांची खुण काय, पाऊस कसा पडतो, मला बाहेर फिरायला कसं जायचं आहे किंवा मला आणखी हवं आहे. एखादा मित्र किंवा एखाद्या मैत्रिणीला कशा पद्धतीने बोलवायचे, आपल्याला काय हवं, असल्यास कसं सांगायचं या सगळ्या गोष्टींच्या सांकेतिक चिन्हांचे वर्णन करून मुलांना त्याची सखोल माहिती शिक्षकांनी दिली. नवी भाषा शिकत चिमुकल्या मुलांनी मनमुराद आनंद लुटला. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.

श्रवणऱ्हास शिबिर होणार
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या कानाची ऐकण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुलांना इअरमोल्ड बनवणे व ऑडिओमेट्रिव्दारे (BERA) श्रवण ऱ्हास काढणे शिबिराचे आयोजन ६ ऑगस्ट आणि ८ ऑगस्ट रोजी आयोजित केले आहे. मुंबई येथील राकेश मकवाना, डॉ. ऋषीकेश चौगुले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...