आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्यामची आई:संस्कारांसाठी श्यामची आईसारखी पुस्तके वाचायला द्या : वडगबाळकर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साने गुरुजी, महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्रींसारखे आदर्श आहेत. त्यांना विसरू नका. संस्कारांसाठी श्यामची आई सारखी पुस्तके मुलांना वाचू द्या, असे विचार श्रुतीश्री वडगबाळकर यांनी व्यक्त केले.

त्या डाॅ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात अ. भा. साने गुरुजी कथामालाच्या बालसहित्य सेवा व गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अवधूत म्हमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यवाह अशोक खानापुरे, कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुमन नवलकर यांना निर्मला मठपती स्मृती राज्यस्तरीय बालसाहित्य सेवा पुरस्कार तर युवराज माने यांना प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती- राज्यस्तरीय बालसाहित्य सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले. पुस्तक, रोख रक्कम २५०० रुपये असे त्याचे स्वरूप होते. याशिवाय सविता कस्तुरे, लक्ष्मी वाडीकर, गीता चिकमनी, अभिनंदन विभूते, राजूभाई मुलाणी, अलका मलगोंडा, सूर्यकांत वाघमोडे, सुरेश राठोड, सारंग पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रंगसिद्ध दसाडे, प्राचार्य उज्ज्वला साळुंके प्रा. गणेश लेंगरे, रामचंद्र धर्मसाले आदींचाही सन्मान करण्यात आला.

प्रार्थना सभेत अरुण कुमार धुमाळ आणि रामचंद्र धर्मसाले यांनी प्रार्थनेचे गायन केले. रामचंद्र धर्मसाले आणि डाॅ. देविदास गुरव यांनी सन्मान पत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा आरती काळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...