आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गातील स्वच्छता दूत गिधाडांसाठी सुरक्षितता हवी:बीएनएचएस संस्थेने राज्य शासनाला पाठवले पत्र; गिधाडांच्या संवर्धनाची केली मागणी

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाट गडचिरोली जिल्ह्यातील काही भाग वगळता राज्यात गिधाड पक्षी आढळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन निमित्ताने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ( बीएनएचएस) यांनी गिधाडांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित ठिकाण म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये व पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांना पत्रही पाठवले आहे.

मृतदेहांचे मांस हे गिधाडांचे प्रमुख खाद्य असल्याने निसर्गातील सफाई कर्मचारी असून अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा असणारा हा पक्षी आहे. रामायणामध्ये प्रभू श्रीराम यांना मदत करणारा, रावणाशी युद्ध खेळणारा पक्षी असाही संदर्भ या पक्षाबद्दल आहे.

बीएनएचएस तर्फे केंद्र सरकारच्या वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय मध्य प्रदेश, आसाम सरकारांच्या संयुक्त विद्यमाने गिधाड संशोधन व संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. गुरांना दिलेल्या डायक्लोफेनेक या जनावरांना दिलेल्या या औषधांमुळे गिधाडांच्या आरोग्यासोबत त्यांच्या प्रजननावरही परिणाम होत आहे . गिधाड हा पक्षी उंच झाडावर, कड्यावर मोठय़ा काठ्या वापरून घरटी बनवतात व एका वेळी एक अंडे घालून पिल्लू जन्माला घालत असतात. सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार हा गिधाड संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने बी येण्याच्या संस्थेने राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे गिधाडांच्या संवर्धनाची मागणी केली.

पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब व बारीक चोचीचे गिधाड आणि लाल डोक्याचे गिधाड या चार प्रजातीच्या गिधाडांची संख्या मोठया प्रमाणावर घटली आहे. संकटग्रस्त प्रजातीमध्ये या पक्षाचा समावेश आहे. डायक्लोफॅनक वरील बंदी नंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नसल्याने राज्य सरकारने महाराष्ट्राला त्वरित गिधाडांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. यासाठी बीएनएचएस संस्था मार्गदर्शनासाठी पुढाकार घेईल, असे आश्वासन संस्थेचे मानद सचिव किशोर रिठे यांनी दिले. संस्थेतर्फे गिधाडांबाबत माहिती देणाऱ्या मराठी पोस्टरचे प्रकाशनही नुकतेच करण्यात आले. तसेच, डब्ल्यूडब्ल्यू एफ संस्थेने 'गरज गिधाड संवर्धनाची' हे मराठी पोस्टर हे प्रकाशित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...