आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:तीन कृषी किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित

आष्टी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी (ता.माेहाेळ) येथील विठ्ठल कृषी केंद्र, नातेपुते (ता. माळशिरस) येथील कलाशंकर कृषी केंद्र तर माळशिरसच्या महावीर ट्रेडिंग कंपनी या तीन कृषी दुकानांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. मॉडर्न अॅग्री जेनेटिक्स या किटकनाशक पुरवठा करणाऱ्या पुरवठाधारकाचे प्रमाणपत्र मंजूर नसताना विक्री करीत असल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

तीनही दुकानांची तपासणी केली असताना दुकानदाराने किटकनाशकाचा साठा, भावफलक ग्राहकास दिसेल अशा दर्शनी भागात लावलेला नाही. किटकनाशकाचा साठा किती आहे ? हे नमूद केले नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या बिलावर औषध कंपनीचे नाव, पॅकिंग प्रकार, बॅच, उत्पादनाची तारीख, मुदत व किंमत नमूद केले नाही.

मॉडर्न अॅग्रीजेनेटिक्सची विक्री परवान्यास मान्यता नसल्याने परवाना निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे वरील तीनही दुकानदारांना निलंबन काळात कोणत्याही प्रकारची किटकनाशक विक्री करता येणार नाही. वरील तीनही दुकानाचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित असल्याचे आदेशात नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...