आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवाने निसर्गाचे खूप नुकसान केले आहे. भूतलावरील तापमान वाढले आहे. ऐषोरामासाठी आपण ज्या बाबी स्वीकारत आहोत त्यामुळे पर्यावरणाचे आणखी नुकसान होते आहे. पर्यावरण जपण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावणे, त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे, यामुळे दररोज पर्यावरण दिन आहे, असे समजून आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी तथा विभागीय वन अधिकारी मनीषा पाटील यांनी सोमवारी येथे केले. युनिसेफ महाराष्ट्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल, भूशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण सप्ताहाचा समारोप झाला.
विविध स्पर्धांमध्ये भूशास्त्र संकुलाने सर्वाधिक पारितोषिके मिळवली. ८ ते १३ जूनदरम्यान आयोजित सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा, उपक्रम, नेचर वॉक आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे, भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सचिन लड्डा, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनायक धुळप मंचावर उपस्थित होते. संचालक डॉ. सचिन लड्डा, संचालक डॉ. जी. एस. कांबळे, विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठात सातत्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून यापुढच्या काळात विद्यार्थ्यांचा एक निसर्ग मंच असावा, विद्यार्थ्यांना उपक्रमांसाठी गुण देण्याची विद्यापीठाची तयारी असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार मानले. याप्रसंगी डाॅ. अंबादास भासके, प्रा. तेजस्विनी कांबळे, प्रा. ऋषिकेश मंडलिक, डॉ. सदाशिव देवकर उपस्थित होते.
विद्यापीठात पर्यावरण सप्ताहांतर्गत नेचर वॉक आयोजित करण्यात आला. यास सहभागी विद्यार्थी. निबंध स्पर्धा : अंबिका अच्युगटला, संकल्प मल्लिकार्जुन, सचिन गायकवाड व यश येरनाळ पर्यावरण पूरक रांगोळी स्पर्धा : अस्मिता घाडगे, प्राजक्ता पाटील, स्नेहल गंगा व माधुरी कापुरे छायाचित्र स्पर्धा : स्वप्निल गायकवाड, महेश जगताप, सिद्धार्थ तळभंडारे, आदित्य धवण, इस्माईल पठाण डीएसएलआर कॅमेरा गट : अशितोष पाटील. - पोस्टर स्पर्धा : सिद्धार्थ तळभंडारे, वृषाली डिंगरे, धनश्री अवजारे प्रश्नमंजुषा स्पर्धा : प्रथम गट-धनश्री भोसले, मृण्मयी गवळी आणि सई जाधव व्दितीय गट - सिद्धार्थ भंडारे व सुनील शेंडगे (सामाजिक शास्त्रे संकुल), तृतीय गट - प्रदीप कसबे, सौरभ पाटील व राज जमादार दमदार (केमिकल सायन्सेस) विद्यापीठात पर्यावरण सप्ताहांतर्गत नेचर वॉक आयोजित करण्यात आला. यास सहभागी विद्यार्थी.
निबंध स्पर्धा : अंबिका अच्युगटला, संकल्प मल्लिकार्जुन, सचिन गायकवाड व यश येरनाळ पर्यावरण पूरक रांगोळी स्पर्धा : अस्मिता घाडगे, प्राजक्ता पाटील, स्नेहल गंगा व माधुरी कापुरे छायाचित्र स्पर्धा : स्वप्निल गायकवाड, महेश जगताप, सिद्धार्थ तळभंडारे, आदित्य धवण, इस्माईल पठाण डीएसएलआर कॅमेरा गट : अशितोष पाटील. - पोस्टर स्पर्धा : सिद्धार्थ तळभंडारे, वृषाली डिंगरे, धनश्री अवजारे प्रश्नमंजुषा स्पर्धा : प्रथम गट-धनश्री भोसले, मृण्मयी गवळी आणि सई जाधव व्दितीय गट - सिद्धार्थ भंडारे व सुनील शेंडगे (सामाजिक शास्त्रे संकुल), तृतीय गट - प्रदीप कसबे, सौरभ पाटील व राज जमादार दमदार (केमिकल सायन्सेस)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.