आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजमाध्यमातून आलेल्या लिंकवर लाइक करा आणि पैसे मिळवा, असा मेसेज हाेता. त्यानुसार केल्याने सुरुवातीला छाेट्या रकमा बँक खात्यावर जमा झाल्या. विश्वास बसल्यानंतर माेठ्या रकमांचा खेळ सुरू झाला आणि खात्यावरील रक्कमच ‘खल्लास’ झाली. रक्कम छाेटी नव्हे, तब्बल २ लाख ३२ हजार ५०० रुपये घालवून बसले. याेगेश आदिनाथ सगरे (वय ३५, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, विमानतळाजवळ) या फसवणूक झालेल्या तरुणाला पाेलिस ठाणे गाठावे लागले. विजापूर नाका पाेलिस ठाण्यात श्री. सगरे यांनी फिर्याद दिली. त्यांना एका अॅपमध्ये ‘ग्लाेबल क्रीप्टाे-१’ नावाची लिंक आली हाेती. त्याच्याखाली या लिंकमधील व्हिडिआेला लाइक व सबस्क्राइब केल्यास १५० रुपये मिळतील, असा मेसेज हाेता.
त्यानुसार सगरेंनी केले. काही वेळातच त्यांच्या अॅक्सिस बँकेतल्या खात्यावर १५० रुपये जमा झाल्याचा संदेश आला. सातत्याने हा प्रकार सुरू हाेता. सगरेंची कृती हाेती. हजार रुपयांवरून ही रक्कम थेट ५० हजारांपर्यंत गेली. शेवटी ८ लाख रुपये मिळवण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये पाठवा, असा मेसेज आला. ही फसवणूक असल्याचे सगरेंना कळले. परंतु ताेपर्यंत २ लाख ३२ हजार ५०० रुपये घालवून बसले होते. याबाबत पाेलिस निरीक्षक जगताप तपास करत आहेत.
अशी कृती कधीच करू नका, डिलीट हाच उपाय
कुठल्याही अॅपमधून लिंक आली आणि त्यावर लाइक करा, सबस्क्राइब करा, पैसे मिळवा, असा मेसेज आला तर ताे वाचून तातडीने डिलीट करा. त्या मेसेजनुसार कृती कराल तर सुरुवातीला काही पैसे मिळतील. तुमचा विश्वास बसेल. त्यानंतर तुमच्याच खिशातून ते पैसे काढत आहेत, हे लक्षातही येणार नाही. जेव्हा येईल, तेव्हा तुमचे बरेच पैसे गेलेले असतील. हे फसवणुकीचे एक तंत्र आहे. त्याला बळी पडू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.