आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यास व‎ पर्यावरणास घातक:बिटला प्रशालेत नैसर्गिक रंग‎ निर्मितीत गुंतले लहानसे हात‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुने विडी घरकुल येथील बिटला‎ प्रशालेमध्ये पर्यावरण मंडळाच्या‎ वतीने विद्यार्थ्यांची नैसर्गिक रंग‎ निर्मिती कार्यशाळा झाली.‎ रासायनिक रंग आरोग्यास व‎ पर्यावरणास घातक असतात.‎ नैसर्गिक रंग वापरणे गरजेचे आहे.‎ शाळेत नैसर्गिक वस्तूंपासून रंग‎ निर्मिती करण्याचे प्रशिक्षण‎ विद्यार्थ्यांना देण्यात आले. हळद,‎ पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या,‎ जास्वंद, गुलाबाच्या पाकळ्या,‎ मेंदीचे पान यांचे पिठाबरोबर मिश्रण‎ करून कोरडे नैसर्गिक रंग तयार‎ करण्यात आले. बीट, पिवळी आणि‎ नारंगी झेंडूची फुले, पालक, पुदिना‎ ,आवळा, बेलाचे फळ, गुलाब‎ ,जास्वंद, कडुलिंबाचा पाला,‎ मेंदीची पानं यांच्यापासून ओल्या‎ रंगाची निर्मिती देखील करण्यात‎ आली. यातून ''खेलो होली इको‎ फ्रेंडली'' हा संदेश देण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...