आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:लोहार यांच्या घराची झडती,काॅल डिटेल्स तपासणी सुरू

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडलेले शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाची झडती घेतली. काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच, पोलिसांकडून कॉल डिटेल्स् तपासणीचे काम सुरू आहे.

दरम्यान, जि.प. सीईओ दिलीप स्वामी यांनी लोहार यांच्याकडील शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार काढून घेऊन उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे सोपवला. लाच स्वीकारताना सापडल्यानेे लोहारांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे दिला आहे.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने लोहार यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली. पण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. लोहार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी होईल.

प्राथमिकचा अतिरिक्त पदभार जावीर यांच्याकडे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी पदाची धुरा उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे दिली आहे. ते शुक्रवारी सकाळी पदभार घेण्याची शक्यता आहे. अनेक शिक्षक वैयक्तिक कामासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात आले होते. शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून टेबलला चिटकून असलेल्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...