आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर बँकेच्या 10 जागांसाठी निवडणूक:10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; 'लोकमंगल' बिनविरोध

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर नागरी बँकेचे आरक्षणातील 5 संचालक बिनविरोध झाले. पण, 10 जागांसाठी 12 उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक लागली आहे. तर, रोहन देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याने लोकमंगल बँकेचे सर्व संचालक अविरोध निवडणूक आले आहेत.

शहरातील दोन्ही नामांकित नागरी बँकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सिद्धेश्वर बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारणचे 10 संचालक निवडीसाठी 12 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सत्ताधारी गटाकडून चेअरमन प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, पशुपती माशाळ, एम.के. पाटील, प्रकाश हत्ती, शिवानंद कोनापुरे, सिद्धेश्वर मुनाळे, ईरप्पा सालक्की, महेश शिंदगी, बाळासाहेब आडकी तर विरोधात बसवराज माशाळे व एन.डी. जावळे हे उमेदवार आहेत.

विरोधातील दोघेही संचालक मंडळावर होते. महिलामधुन सुचेता मिलींद थोबडे, रुपाली बसवराज बिराजदार, भटक्या विमुक्तमधुन तुकाराम काळे, अनुसूचित जातीतून अशोक लांबतुरे बिनविरोध झाले आहेत. तर, बुधवारी (23 नोव्हेंबर) इतर मागासवर्ग मधील इतर इच्छुक उमदेवारांनी अर्ज माघारी घेतले असून माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्याही प्रवर्गाची निवड बिनविरोध झाली. दरम्यान, मावळते संचालक बसवराज माशाळ यांनी ओबीसी व खुला अशा दोन्ही प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. बुधवारी त्यांनी ओबीसीचा अर्ज मागे घेतला. पण, सर्वसाधारण गटातील अर्ज ठेवला.

बुधवारी रोहन देशमुख यांनी अर्ज माघारी घेतल्याने लोकमंगल बँकेच्या सर्वसाधारणचे 12 संचालक निवडीसाठी 12 अर्ज शिल्लक राहिल्याने सर्वच 12 संचालक बिनविरोध निवडून आले. आरक्षणातील 5 संचालक या अगोदरच बिनविरोध झाले आहेत. लोकमंगल बॅकेचे अध्यक्ष आमदार आमदार सुभाष देशमुख, देवानंद चिलवंत, सतीश लामकाने, जाॅन चोप्रा, अनंता चव्हाण, निलेश पटेल, अभिजित टाकळीकर, प्रदीप नागणे, विजय कुलकर्णी, सिद्धार्थ सर्जे, नरेंद्र काटीकर, जितेंद्र नाईक हे सर्वसाधारण तर अनुसूचित जाती प्रल्हाद कांबळे, इतर मागासवर्ग अशोक मादगुंडी, भटक्या विमुक्त-मधुन अशोक सापटणेकर, महिला मधुन शीतल अतुल कोकाटे, उज्वला संजय चेळेकर आदीं संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

सिद्धेश्वर बँकेचे 10 संचालक निवडण्यासाठी 13 हजार सभासद असून (4 डिसेंबरला) सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मतदान होईल. पाच डिसेंबरला सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणी होईल.

बातम्या आणखी आहेत...