आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाडळकर, फोंडके, उत्रादकर यांना लोकमंगल; 8 जानेवारीला पुरस्काराचे वितरण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेसमीक्षक, लेखक विजय पाडळकर (नांदेड), विज्ञान लेखक डाॅ. बाळ फोंडके (पुणे) आणि साहित्यिक रमेश इंगळे उत्रादकर (बुलढाणा) यांना राज्यस्तरीय लोकमंगल पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच संशोधक डाॅ. मुहम्मद आझम यांना लक्षणीय कामगिरी आणि लेखक राजेंद्र दास यांना जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार वितरण सोहळा ८ जानेवारीला प्रा. श्रीराम पुजारी संकुलातील किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी सहाला होणार आहे. प्रा. अविनाश सप्रे व सिनेकलावंत मृणाल कुलकर्णी देव यांच्या उपस्थित पुरस्कार वितरण होईल.

सांस्कृतिक कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला निवड समितीचे सदस्य नितीन वैद्य, ऋचा कांबळे, शिरीष देखणे, दत्ता घोलप यांच्यासह शोभा बोल्ली उपस्थित होत्या.

श्री. पाडळकर यांना त्यांच्या ‘तो उंच माणूस’ पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येत आहे. त्यात त्यांनी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सत्यजीत रे यांचे जीवन व कार्य रेखाटले आहे. डाॅ. फोंडके यांच्या ‘ऋणानुबंध’ पुस्तकासाठी आणि श्री. इंगळे यांच्या ‘एका कादंबरीची गोष्ट’ पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येत आहे.

साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार संशोधक डाॅ. आझम (रा. मुंबई, मुळगाव मैंदर्गी ता. अक्कलकोट) यांना त्यांच्या ‘दखनीचा आद्य काव्य’ ग्रंथसाठी पुरस्कार देण्यात येत आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे त्याचे स्वरूप आहे. प्रा. दास यांना ११ हजार रोख रुपये रोख, स्मृती चिन्ह व सोलापूर चादर प्रदान करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...