आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Lokvahini ST Awakened And Sustained The Confidence Of Ordinary Passengers For 75 Years; Depot Head Dattatraya Kulkarni's Opinion |marathi News

कार्यक्रम:लोकवाहिनी एसटीने 75 वर्षे सामान्य प्रवाशांचा विश्वास जागवला, टिकवला; आगार प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांचे मत

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोलापूर आगार विभागाच्या वतीने एसटीच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

ग्रामीण भागात संपूर्ण महाराष्ट्राला लोकवाहिनी म्हणून परिचित असलेल्या एसटीने ७५ वर्षे सामान्य प्रवाशांच्या विश्वास जागवला, तो टिकवून ठेवला. अविरत सेवा देणारे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महामंडळ म्हणून या व्यवस्थेकडे पाहिले जाते. हा विश्वास केवळ प्रवाशांमुळे असून, प्रवाशांनी आजवर दिलेल्या सोबतीमुळे आणि सहकार्यामुळेच एसटी महामंडळाची ७५ वर्षे सुखकर गेली, असे मत आगार प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ते एसटी महामंडळाच्या सोलापूर आगार विभागाच्या वतीने एसटीच्या ७५ व्या वर्षाच्या पदार्पणात आणि ७४ व्या वाढदिवसानिमित्त अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर एसटी अभियंता विभाग प्रमुख वीरसंग स्वामी, यंत्र अभियंता विवेक लोंढे, सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे, वाहतूक निरीक्षक अशोक बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केक कटिंग करून तिचा वाढदिवस साजरा केला आणि एसटीला सुंदर रीतीने सजवून तिची पूजा करून औक्षण करण्यात आले. याप्रसंगी प्रवासी व कर्मचारी यांना केक वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

वेगळे अस्तित्व दाखवून दिले
एसटीने हजारो कुटुंबाच्या जडणघडणीत आई-वडिलांची भूमिका पार पाडली आहे. एखाद्या गावाहून प्रवास करून शिक्षणासाठी जायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी तिचे महत्त्व आई-वडिलांप्रमाणेच होते. याशिवाय रुग्ण असो किंवा मतदान असो पूर असो किंवा भूकंप किंवा कोरोना सर्व काळात तिने सामान्य नागरिकांच्या, गरजूंच्या आणि प्रशासनाच्या मदतीला कायम जात आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे.
दत्तात्रय कुलकर्णी, आगार प्रमुख

महामंडळाची महत्त्वाची भूमिका
एसटी महामंडळाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, सामान्य नागरिकांची लालपरी म्हणून एसटी ओळखली जाते. लालपरीने प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या अनेक गरजा भागवण्यासाठी अविरत ७४ वर्षे प्रवास केला. एसटीचे आता हे ७५ वे वर्ष सुरू झाले असून, या ७५ वर्षात एसटीने वेळोवेळी स्वतःची प्रगती केली आहे आणि त्यात महामंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शेखर फरांदे, सुरक्षा व दक्षता अधिकारी

बातम्या आणखी आहेत...