आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:कमी शुद्धतेचे सोने तारण; ठाणे जनता सहकारी बँकेला सहा लाखांचा गंडा

सोलापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कमी शुद्धतेचे साेने खरे असल्याचे भासवून सोने तारण म्हणून ठेवून त्यावर कर्ज घेतले. कर्जाची परतफेडही केली नाही, अशा प्रकारे ५ लाख ९३ हजार रुपयांची बॅँकेची आर्थिक फसवणूक केली. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात रस्ता रेल्वे लाइन येथील ठाणे जनता सहकारी बॅँकेत हा प्रकार घडला. या प्रकरणी अन्नपूर्णा विजयकुमार पिरंगे (वय ४३, रा. चिंचोळी एमआयडीसी, कोंडी), विजयकुमार उल्हास पिरंगे (वय ४१, रा. चिंचोळी एमआयडीसी), दिनेश अभिमान सोनटक्के (वय ३७, रा. माने वस्ती, मोहोळ), दिलीप सौदागर ननवरे (वय ३५, रा. बीबीदारफळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वरील चौघांनी बॅँकेचे व्हॅल्युअर मुकुंद माणिकराव जोजारे (वय ६४, रा. दक्षिण कसबा, दत्त मंदिर) यांच्याशी हातमिळवणी केली. यानंतर कमी शुध्दतेचे सोने हे खरे असल्याचे भासवून बाजारभावाप्रमाणे बँकेतून कर्ज काढले. यानंतर कर्जाची परतफेडही केली नाही. बँकेची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बॅँक मॅनेजर पंकज अनिल कुलकर्णी (वय ४६, रा. एसटी कॉलनी, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...