आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोखा राखण्याची अनोखी प्रथा:जिव्हेश्वर जयंती निमित्त 80 दशकापासून स्नेहभोजनाचा कार्यक्रम

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत श्री जिव्हेश्वर जयंती निमित्त गेल्या 80 वर्षांपासून समाज बांधवांच्या घरी उत्सवा दरम्यान स्नेहभोजनाची परंपरा कायम राखण्यात आली आहे. यानिमित्ताने जे जे लोक उत्सवात सहभागी होतात त्या सर्वांना सातत्याने नऊ दिवस वेगवेगळ्या स्नेहांच्या घरी जेवणाचे आमंत्रण देऊन स्नेहभोजनाचा आनंद दिला जातो या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून एकमेकांच्या घरी जाणे उत्सवा दरम्यान एकमेकांशी सलोखाराखणे आणि वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखणे असा उद्देश असतो अशी माहिती समाजाचे प्रमुख जय हरी साखरे यांनी दिली.

श्रावणात पहिल्या सोमवारी श्री जिव्हेश्वर जयंती उत्सवाला प्रारंभ होतो हा उत्सव सलग नऊ दिवस चालतो आणि नवव्या दिवशी उत्सवाचा समारोप केला जातो. विजापूर वेसेत असणाऱ्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणूक पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भक्त सहभागी होतात मात्र या संपूर्ण उत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या स्नेहभोजनाचे परंपरा ही समाज बांधवांसाठी आवडीची गोष्ट आहे. सातत्याने नऊ दिवस रोज एका समाज बांधवांच्या घरी जेवण असल्याचे जाहीर केले जाते उत्सवासाठी येणाऱ्या मंदिरातील सर्व भक्तांना त्या समाज बांधवांच्या घरी त्या त्या दिवशी जेवणाचा आमंत्रण देऊन घरी मोठ्या प्रेमाने आणि सन्मानन जेवणासाठी बोलवले जाते असा नऊ दिवसाचा कार्यक्रम ठरवून त्यानुसार नऊ दिवस सातत्याने वेगवेगळ्या समाज बांधवांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम केला जातो.

किती समाज बांधव येऊ दे

ज्ञाती विश्वस्त जयहरी साखरे म्हणाले की, घर छोटं असले आणि माणसे भरपूर असली तरी 10 किंवा 20 च्या पंगती उठून का असेना पण प्रत्येक माणसाला जेवण केल्याशिवाय पाठवले जात नाही आणि हा भंडारा कितीही कमी प्रमाणात केला तर तो सर्वांना पुरेल अशा पद्धतीने समाधानांनी वाटप केला जातो. त्यामुळे आलेल्या प्रत्येक माणूस पोटभर अन्न खाऊन मगच घरी जातो. ही अशी समृद्ध परंपरा या अनोख्या उपक्रमाला आहे.

बातम्या आणखी आहेत...