आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदव्युत्तर परीक्षांमध्ये चुकांची पुनरावृत्ती:एम.ए. मराठी भाग एकच्या परीक्षेत पुन्हा चुका

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गोंधळाची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे पदव्युत्तर परीक्षांमध्ये चुकांची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे.

बुधवार, ४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सत्रात एम.ए. भाग एकचा “आधुनिक मराठी वाङमयाचा इतिहास १९२० ते १९६०’ या विषयाची परीक्षा होती. यातील प्रश्न क्रमांक सहा व प्रश्न क्रमांक ३४ तोच होता. याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ३९ ला चुकीचे पर्याय दिले होते. परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर हे माहिती घेऊ, कारवाई करू, अशा प्रतिक्रिया देऊन सुटका करून घेत आहेत. प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा डागाळत आहे.

बातम्या आणखी आहेत...