आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई ​​​​​​​:एम.ए. उर्दूच्या पेपर सेटरला विद्यापीठाने परीक्षा कामकाजातून काढले

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याकडून कारवाई

विद्यापीठ परीक्षांमध्ये सातत्याने चुका होत आहेत. या चुकांकडे दुर्लक्ष करत ‘ऑल इज वेल’ म्हणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला अखेर काही प्रमाणात जाग आली आहे. चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी विद्यापीठाने दर्शविली आहे. शुक्रवारी परीक्षा विभाग संचालक, अधिकारी यांच्यासमवेत आढावा घेत परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा व चुका करणाऱ्या पेपरसेटर प्राध्यापकांवर कारवाई केली. याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पेपरसेट करताना प्राध्यापकांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे विद्यापीठास नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. यावर विद्यापीठ अधिनियमानुसार कडक कारवाई होणार आहे, असे त्या म्हणाल्या.

उर्दू प्रश्नपत्रिका : प्राध्यापकावर केली दंडात्मक कारवाई विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमाच्या उर्दू परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत पेपरसेटरची समितीकडून चौकशी करण्यात आली. त्यानुसार संबंधित प्राध्यापकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजातूनही त्यांना काढून टाकण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, योग्य खबरदारी घेऊ
परीक्षेतील चुकांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाही. यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची आम्ही खबरदारी घेत आहोत. विद्यार्थ्यांना जितके काही चांगले देता येईल, ते देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

मराठी प्रश्नपत्रिका काढणाऱ्या प्राध्यापकावर होणार कारवाई
मराठी विषयाची प्रश्नपत्रिका काढणाऱ्या प्राध्यापकावर विद्यापीठाकडून कारवाईचे संकेत मिळाले आहेत. एम.ए. भाग एक मराठी विषयाच्या पेपरमध्येही चुका आढळल्या आहेत. त्याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...