आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा:राज्यातील 447 शिक्षण सेवकांसह शिक्षकांच्या नाेकरीवर गदा ; ऑगस्टपासून सुरुवात

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुरू असलेल्या टीईटीच्या गोंधळाचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातीलही अपात्र असलेल्या १२ जणांचा समावेश आहे. सेवेत असलेल्या व पात्र असलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवण्यात यावे, अशा सूचना संचालकांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे सोलापुरातील मातब्बर शाळांमधील त्या शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबण्यात येईल. वेतन अदा केल्यास संबंधित वेतन अधीक्षकासह सर्वांवर कारवाई केली जाणार आहे, असे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी आदेश काढून कळवले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये ७८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने चौकशीअंती अपात्र केले आहेत. या उमेदवारांची यादीही महाआयटी मुंबई यांना नावानुसार व आधार क्रमांकानुसार मॅपिंग करण्यासाठी दिली होती. मॅपिंग करून प्राप्त यादीनुसार अपात्र उमेदवारांपैकी ४५६ पैकी ९ नावे दोन वेळा आलेली आहेत. दोन वेळा आलेल्या ९ नावे वगळून उर्वरित एकूण ४४७ उमेदवार राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण सेवक व सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये पुणे विभागातील २८ तर सोलापुरातील १२ जणांचा समावेश आहे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेतन अदा होणार नाही
शालार्थ आयडी गोठविण्यात आलेल्या उमेदवारांची माहे ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाइन अथवा ऑफलाइन वेतन अनुदान अदा होणार नाही याची सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. प्रकरणी वेतन अथवा फरक देयक अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई होणार आहे, असे महेश पालकर यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...