आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुरुहिनशेट्टी समाज कुलदैवत नीलकंठेश्वर रथाेत्सव आणि जत्रा यंदा १० ऑगस्ट हाेईल. त्याच्या नियाेजनासाठी पदाधिकारी निवडण्यात आले. अध्यक्षपदी माेहन मादगुंडी यांची निवड झाली. इतर पदाधिकारी असे : शांता संगा (कार्याध्यक्ष), नरसिंग सरला, व्यंकटेश बुगडे (उपाध्यक्ष), मुरली कनकी (सचिव), अमित मादगुंडी, कृष्णा काकी, अक्षय संगा (सहसचिव), अंबादास मादगुंडी (खजिनदार), बालाजी आडकी (सहखजिनदार), दीपक गणपा, प्रकाश बुट्टा, विलास गडगी, मोहन कर्रे, राजू बुगडे, रमेश मिठ्ठा, योगेश मोने (सर्व मिरवणूक प्रमुख), निशा केंचीगुंडी, निर्मला तट्टे (सांस्कृतिक प्रमुख), यांची एकमताने निवड करण्यात आली.
समाजातील मान्यवरांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काेविडमुळे गेली दाेन वर्षे हा उत्सव मंदिरातच झाला. यंदा निर्बंध हटवल्याने जत्रा माेठ्या उत्साहात करण्याचे या वेळी ठरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.