आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमपीएससी निकाल:माढा तालुक्याचा एमपीएससीत डंका, तालुक्याला मिळाले तीन अधिकार 

माढा (संदीप शिंदे)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मास्तरचा मुलगा झाला तहसीलदार, अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला उपशिक्षणाधिकारी, शेतकऱ्याची लेक झाली नायब तहसीलदार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असुन यात माढा तालुक्यातील तिघे तरुण अधिकारी म्हणुन चमकले आहेत. निंमगाव(टे) गावच्या आदित्य अजिनाथ  शेंडे यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. तसेच कुर्डू गावातील सोनाली मनोहर भाजीभाकरे यांची नायब तहसीलदार म्हणून तर  विठ्ठलवाडी गावच्या नितेश नेताजी कदम यांची वर्ग 2  उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

तहसीलदार झालेल्या अदित्य यांचे आई वडील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक आहेत. अभ्यासात सातत्य ठेवत आत्मविश्वास अन् जिद्दीच्या जोरावर मी हे यश मिळवले असुन स्पर्धा परीक्षेच्या तरूणांनी आई वडिलांच्या कष्टांची जाण ठेऊन अभ्यासात गुंतावे. मोबाईल मधील सोशल माध्यमावर टाईप पास न  करण्याचे आवाहन तरुणांना  तहसीलदार झालेल्या आदित्य ने केले आहे. आदित्यची बहिणोने देखील  एमपीएससीची परीक्षा दिली होती. ती केवळ एका गुणाने फेल ठरली आहे. विठ्ठलवाडी मधील इंदुमती कदम या अंगणवाडीच्या सेविकेच्या तर नेताजी  कदम या  शेतकऱ्याच्या लेकाने उपशिक्षणाधिकारी हे पद मिळवले. नितेश याचा मोठा भाऊ निलेश हे भारतीय सैन्य दलात तर बहिण निरोपा या आर टिओ विभागात अधीकारी  म्हणुन कार्यरत  आहेत. नितेश च्या रुपाने तिसरा शासकीय अधिकारी कदम यांच्या घरात   तैनात झाला आहे.

नितेश कदम याने खुल्या संवर्गातून राज्यात 8 वा क्रमांक पटकाविला आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा विठ्ठलवाडी, माध्यमीक  केंद्रीय नवोदय विद्यालय पोखरापूर येथे तर विज्ञान शाखेची पदवी पूणे येथून घेतली. त्यास पोलिस उपअधीक्षक सचिन कदम व सुदर्शन शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले. कुर्ड गावची कन्या सोनाली मनोहर भाजीभाकरे यांची नायब तहसीलदार पदासाठी निवड झाली असुन आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या वडील ,दोन भाऊ यांच्या कष्टाचे चीज केलंय.

भाजीभाकरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमीक शिक्षण  माध्यमिक शिक्षण आंतरभारती विद्यालय येथे झाले. तर  उच्चमाध्यमिक शिक्षण हे कुर्डूवाडी येथील महाविद्यालयात तर एम.बी.ए चे शिक्षण सोलापूर येथे पुर्ण करुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास पुणे येथील युनिक स्टडी सर्कल येथे करत होत्या. सोनाली यांनी याअगोदर सहावेळा  प्रयत्न केला व तीन मेन्सची परिक्षा दिली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये त्यांना हे यश मिळाले आहे. तिघा ही अधिकाऱ्यांवर तालुका वासिंयामधुन अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

बातम्या आणखी आहेत...