आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:माधुरी त्रिमल, मिरजकर ठरल्या‎ सहस्रार्जुनच्या ‘हाेम मिनिस्टर’‎

साेलापूर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री सोमवंशीय सहस्रार्जुन महिला मंडळाच्या‎ वतीने महिला दिनानिमित्त ‘होम मिनिस्टर'' स्पर्धा‎ झाली. तीत अंतिम फेरीतील वरिष्ठ गटात‎ कल्पना मिरजकर आणि कनिष्ठ गटात माधुरी‎ त्रिमल यांनी प्रथम क्रमांक मिळवला.‎ सिद्धेश्वर पेठेतील सहस्रार्जुन मंगल‎ कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी‎ लक्ष्मी चव्हाण होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून‎ पद्मा गांगजी यांची उपस्थिती हाेती.‎ चाळिशीच्या आतील आणि वरील महिला‎ अशा दाेन वयोगटात ही स्पर्धा झाली.‎ मनोरंजनातून खेळ असे घेण्यात आलेल्या‎ स्पर्धेचे स्वरूप हाेते. विजेत्यांना प्रोत्साहनपर‎‎‎‎‎‎‎‎ बक्षिसे प्रदान करण्यात आली.

मंडळाच्या‎ अध्यक्षा सुनीता श्रीगिरी, सचिव वीणा मेंगजी,‎ उपाध्यक्षा अंजनाबाई बुरबुरे, वैशाली पवार,‎ शैलजा चव्हाण, अमृता चव्हाण, मंगल‎ पाटील, मनीषा लोमटे, पुष्पा कल्पवृक्ष,‎ अन्नपूर्णा बिद्री, मधु पवार, प्रीती चव्हाण यांनी‎ स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. सुरेखा‎ मेंगजी यांनी सूत्रसंचालन केले.‎

विजेते असे : अंतीम फेरीतील वरिष्ठ गटातील‎ विजेत्या महिला पुढीलमाणे : कल्पना मिरजकर‎ (प्रथम), मीना मेंगजी (द्वितीय), सुरेखा‎ कोल्हापुरे (तृतीय) आणि कनिष्ठ गटातील‎ विजेत्या या प्रमाणे- माधुरी त्रिमल (प्रथम),‎ कृतिका काटवे (द्वितीय), रुपा बसुदे (तृतीय).‎ श्री सहस्रार्जुन महिला मंडळाच्या वतीने हाेम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या आणि मंडळ पदाधिकारी.‎

बातम्या आणखी आहेत...