आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​गौरी आरास:कमी खर्चात केला भव्य दिव्य देखावा ; अमृतमहोत्सव, अमरनाथ यात्रा, कमल पुष्प अन् सामाजिक संदेश

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौराईचा देखावा म्हटलं की भव्यदिव्य काही तरी करावे असे प्रत्येक महिलेला वाटते. त्यानुसारच सोलापुरातील अनेक महिलांनी कमी खर्चात भव्य दिव्य आणि देखणा आरास करून गौराईची अनोखी भक्ती समर्पित केली आहे. यात कुणी कमळातून उमलणारी देवी, कोणी आजादी का अमृत महोत्सव, कुणी अमरनाथ यात्रा, तर कुणी सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे. यातून आपआपल्या परीने सगळ्यांनी आरास देखणा आणि त्यातून प्रत्येकाला काही तरी घेण्यासारखे तयार केले आहेत.

सैफुलच्या राजश्री माने व राधिका माने या दोन्ही जाऊबाईंनी आपल्या गौरींना चक्क अमरनाथ पांढऱ्या शुभ्र बर्फात अच्छा दिलेल्या कैलासात उभे केले आहे. जुळे सोलापूरच्या सुनीता पाटील यांनी सामाजिक संदेश देणाऱ्या अन् संघर्षातून आपली यशोगाथा उभ्या करणाऱ्या सर्व थोर स्त्रियांचा देखावा सजवला होता. त्यात राष्ट्रमाता जिजाऊंपासून हिरकणीपर्यंतच्या अनेक महिलांचा समावेश होता. मुरारजी पेठेतील मेघना करवंदे-राहुरकर यांनी आपल्या गौरींना कमळाच्या फुलात उभे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...