आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हशी पळवण्याचा कार्यक्रम:महालक्ष्मी​​​​​​​ यात्रेची सांगता यंदा उंट विडी कारखाना ते सिद्धार्थ चौक दरम्यान कार्यक्रमपरवानगी नसताना म्हशी पळवण्याचा कार्यक्रम, एक जखमी, पोलिसात गुन्हा

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिव्हिल हॉस्पिटलमधील महालक्ष्मी यात्रेनिमित्त गुरुवारी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला म्हशी पळवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ही दाैड पाहण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले हाेते. पण परवानगी नसताना हा कार्यक्रम घेण्यात आल्याने रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी सदर बाझार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आषाढ महिन्यात साजरी हाेणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त गवळी समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. यात्रेतील एक भाग असलेला म्हशी पळवण्याचा कार्यक्रम आज पार पडला. उंट विडी कारखाना ते सिद्धार्थ चौकापर्यंत म्हशी पळवणे व मिरवणुकीचा कार्यक्रम झाला. यात गवळी समाजाची २५० हून अधिक कुटुंबांनी सहभाग नोंदवला. म्हशी पळवण्याचा कार्यक्रमामुळे पोटफाडी चौकात वाहतुकीची काही प्रमाणात कोंडी झाली होती. मात्र गवळी समाजाच्या स्वयंसेवक गर्दी पांगवत वाहनांना वाट मोकळी करून देत होते. म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमात कोणाला काहीच त्रास झाला नाही. यावेळी राजाभाऊ परळकर, संजय शहापूरकर, सिध्दू परळकर, विजय परळकर, राम परळकर, विजय परळकर, अनिल हुच्चे, बंडू गडेप्पा, खंडू पंगुडवाले आदी उपस्थित होते. दरम्यान महालक्ष्मी मंदिरात गुरुवारी पहाटे महाअभिषेक आणि महाआरती झाली. दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. दोन दिवशीय आषाढी यात्रेचा महाप्रसाद वाटपाने समारोप झाला.

गवळी समाजाच्या वतीने गुरुवारी उंट विडी कारखाना ते सिध्दार्थ चौकपर्यंत म्हशी पळवण्याचा कार्यक्रम झाला, ही दौड पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. त्याचवेळी दोन बाजूने म्हशी आल्याने एकाच ठिकाणी गोंधळ झाला. याशिवाय म्हशी रस्त्यावर सैराट पळत होत्या.

जखमी सिव्हिलमध्ये दाखल पोटफाडी चौक ते सिद्धार्थ चौक म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सुरू असताना विनोद काशिनाथ पंगुडवाले (वय २५, रा. मार्कंडेय नगर कुमठा नाका) हा रस्त्यामध्ये खाली पडला व म्हशीचा पाय त्याच्या मानेवर पडून तो जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

सदर बझार पोलिसात संयोजकांवर गुन्हा दाखल
गवळी समाजाच्या वतीने आयोजित म्हशी पळवण्याचा कार्यक्रमास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती अशी माहिती सदर बझार पोलिसांनी दिली. परवानगी नसतानाही मिरवणुक काढल्याने संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोकळ्या जागेत घेतला कार्यक्रम
यंदा म्हशी पळवण्याचा पूर्वी जिल्हा न्यायालय ते उंट बिडी कारखाना या दरम्यान हा कार्यक्रम व्हायचा. यंदा मात्र पोलिसांनी मोकळ्या जागेत कार्यक्रम घेण्यास सांगितले होते. त्यानुसार उंट बिडी कारखाना ते सिद्धार्थ चौक या दरम्यान हा म्हशी पळवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कोणताही अडथळा झाला नाही.
भारत परळकर, अध्यक्ष उत्सव समिती , गवळी समाज समाज.

जखमी सिव्हिलमध्ये दाखल
पोटफाडी चौक ते सिद्धार्थ चौक म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सुरू असताना विनोद काशिनाथ पंगुडवाले (वय २५, रा. मार्कंडेय नगर कुमठा नाका) हा रस्त्यामध्ये खाली पडला व म्हशीचा पाय त्याच्या मानेवर पडून तो जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

सदर बझार पोलिसात संयोजकांवर गुन्हा दाखल
गवळी समाजाच्या वतीने आयोजित म्हशी पळवण्याचा कार्यक्रमास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती अशी माहिती सदर बझार पोलिसांनी दिली. परवानगी नसतानाही मिरवणुक काढल्याने संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोकळ्या जागेत घेतला कार्यक्रम
यंदा म्हशी पळवण्याचा पूर्वी जिल्हा न्यायालय ते उंट बिडी कारखाना या दरम्यान हा कार्यक्रम व्हायचा. यंदा मात्र पोलिसांनी मोकळ्या जागेत कार्यक्रम घेण्यास सांगितले होते. त्यानुसार उंट बिडी कारखाना ते सिद्धार्थ चौक या दरम्यान हा म्हशी पळवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कोणताही अडथळा झाला नाही.
भारत परळकर, अध्यक्ष उत्सव समिती , गवळी समाज समाज.

बातम्या आणखी आहेत...