आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाराज मंडळी उद्या मंदिराला घालणार प्रदक्षिणा

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या प्रस्तावित कॉरिडॉरला वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी विरोध केला आहे. वारकरी संप्रदायातील काही फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांची शनिवारी संत कबीर महाराज मठात बैठक झाली. या वेळी राज्य शासनाच्या पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित काॅरिडाॅरला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या बैठकीत बोलताना वारकरी संप्रदायाचा कुठेही विकासाला विरोध नाही, असे सांगण्यात आले. पंढरपूरचा विकास आराखडा राबवत असताना वारकरी संप्रदायाला विचारात घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच आराखडा तयार केला पाहिजे, अशी मागणी यावेळी हभप नामदास महाराज यांनी केली. वारकऱ्यांना विश्वासात न घेता कॉरिडॉर आणला आहे, विकास कामाला आमचा विरोध नाही. मात्र कॉरिडॉरची अमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत व्हायला नको. डीपी प्लॅनला आमचा विरोध नाही. मात्र कॉरिडॉर नको, यासाठी सोमवारी आम्ही मंदिराभोवती प्रदक्षिणा घालणार आहोत, असे संजय महाराज देहूकर म्हणाले.

श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी संजय देहूकर महाराज, राणा वासकर महाराज, नामदास महाराज, कबीर महाराज, ठाकूर महाराज, उखळीकर महाराज, चवरे महाराज, गुरव महाराज, हंडे महाराज, नंधानकर महाराज, पैठणकर महाराज, तसेच अनेक फडकरी, मठाधिपती, दिंडीप्रमुख, संस्थानिक उपस्थित होते.

नवीन आराखडा देऊ
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीसोबत मिळून वारकऱ्यांच्या दृष्टीने नवा विकास आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमोर लवकरच सादर करू. तोपर्यंत चालू काॅरिडाॅर प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी द्वादशीला दिंडी काढून शासनास काॅरिडाॅरला प्रखर विरोधाचे निवेदन देण्याचा निर्णय झाला.

बातम्या आणखी आहेत...