आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा; शाळा,  महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास, पाटबंधारे, वीजपुरवठा यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. या कामातून नागरिकांच्या जीवनाचा स्तर उंचावेल. शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी दुहेरी पाइपलाइनच्या कामाची निविदा प्रक्रिया निघाली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पास प्राधान्य दिले आहे. यामुळे सोलापूरकरांना रोज मुबलक पाणी मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

राज्याच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ पोलिस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त हरीश बैजल, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भरणे म्हणाले,“ शेतकरी रेशीम लागवड करण्यासाठी आकर्षित होत असून ११९ गावांतील ४७९ शेतकऱ्यांनी ५३० हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. यातून १ लाख ७५ हजार किलोग्रामचे कोष उत्पादन केले आहे. रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ हिरज, तालुका उत्तर सोलापूर येथे उभारण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी ६ कोटी ४७ लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आला आहे. ही बाजारपेठ लवकरच कार्यान्वित होणार आहे. स्थानिक स्तरावरच रेशीम बाजारपेठ उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी रेशीम लागवडीतूनच चांगले उत्पादन घेतील, अशी त्यांनी व्यक्त केली.

भूमी अभिलेख कार्यालयातील संपूर्ण अभिलेखांचे स्कॅनिंग झाले असून नागरिकांना लवकरच अभिलेख आणि मिळकत पत्रिका ऑनलाइन पाहता येणार आहे. ग्रामीण पोलिस विभागाने ऑपरेशन परिवर्तन राबवून अवैध हातभट्टीची दारूची निर्मिती ८० टक्क्याने कमी केली. हातभट्टी व्यवसायातील ६०० कुटुंबापैकी ४४३ कुटुंबांचे पुनर्वसन केले. वर्षानुवर्षे हातभट्टीची दारू तयार करण्यात आणि विकण्यात गुंतले लोक आता ब्रँडेड कपडे शिवत असून त्यांनी शिवलेले शर्ट परदेशात पाठविण्याची जबाबदारी एका गारमेंट्स कंपनीने घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...