आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात सध्या गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. परदेशातही या उत्सवाचा उत्साह काही कमी नाही. कॅनडातील एडमंटन या दहा लाख लाेकसंख्या असलेल्या शहरात ४०० मराठी कुटुुंबाच्या वतीने सण साजरा केला जात अाहे. तिथे स्थायिक झालेले मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील सचिन पाटील आणि त्यांचे इतर सहकारी अगदी उल्हासाने सातासमुद्रापारदेखील गणेशोत्सवाची परंपरा नेटाने जपत आहेत.
संपूर्ण कॅनडात टोरंटो आणि एडमंटन या दोन शहरातच गणपतीची मंदिरे आहेत. येथील गणेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे “श्रीं’ची मूर्ती मंडळाचे कार्यकर्तेच तयार करतात. गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस गणेशमूर्ती बनवण्याचे मोफत वर्ग चालतात. गणेशोत्सव काळात येथील मंदिरात मराठी लाेकांकडून अन्नदान केले जाते. तसेच जेवणात महाराष्ट्रीय पद्धतीचा मेनू आणि मोदकांचादेखील आवर्जून समावेश असतो.
महाराष्ट्र दिन, पाडवा, मकर संक्रांती अन् पायी वारीही काढली जाते
एडमंटनची मराठमोळ्या वेशातील गणेश विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध
दरवेळी नवीन उपक्रम; घरगुती गणपती बसवण्यावर भर
एडमंटनमध्ये अनेक वर्षांपासून गणेशाेत्सव साजरा केला जात अाहे. दरवेळी काही तरी नवीन उपक्रम राबवण्यात येताे. सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला जाताे. यंदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मंडळांचा गणपती बसवण्याएेवजी घरगुती गणपती बसवण्याकडे कल अधिक हाेता, अशी माहिती पाटील यांनी दिली. साऊथ एडमंटनमध्ये मराठी कुटुंबे अधिक राहतात. त्यामुळे येथेच जास्त उत्साह असताे.
दरवर्षी कॅनडातील एडमंटनमध्ये मिरवणूक काढून जल्लोषात उत्सव साजरा केला जातो. पण यंदा कोरोनाचे सावट असल्याने अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला.
-
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.