आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आत्महत्या:आर्थिक चणचणीला कंटाळून सोलापुरातील 37 वर्षीय व्यक्तीने गळा आवळून पत्नी व दोन मुलांची केली हत्या, नंतर स्वतः गळफास घेत केली आत्महत्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्यावर बँकेचे लाखोंचे कर्ज असल्याची माहिती तपासानंतर समोर आली
  • जगताप एक हॉटेल चालवत होते आणि लॉकडाउनमुळे हॉटेल बंद पडले होते

महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये एका 37 वर्षीय व्यक्तीने पहिले पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली आणि नंतर फाशी घेत जीव दिला आहे. रात्री उशीरा ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले की मृताची ओळख अमोल जगताप अशी आहे. जगताप हा हॉटेल चालवत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचे हॉटेल बंद असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावर बँकेचे कित्येक लाखांचे कर्ज असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

अशाप्रकारे घडली घटना 
अशोक जगताप यांच्यासह पत्नी मयूरी (वय 27), मुलगा आदित्य (7) आणि आयुष ()) हे ओल्ड पुणे-नाशिक नाकाजवळ किरायाने राहत होते. अशोकने पत्नी आणि मुलांना गळा आवळून जिवे मारले. नंतर स्वत: ला गळफास लावला. मंगळवारी सकाळी त्याचा दरवाजा फार काळ उघडला नाही. तेव्हा शेजार्‍यांनी पोलिसांना कळवले आणि दरवाजा तोडताच एका खोलीतून चारही मृतदेह आढळले.

घरातून सापडली सुसाइड नोट 
तपासादरम्यान पोलिसांना जगताप यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्या आधारे पोलिस आत्महत्या आणि आर्थिक तंगीतून केलेल्या आत्महत्येचा गुन्हा मानून तपास करत आहे. चौघांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना आणखी काही सुगावा लागणार आहे. जगताप यांनी काही लोकांकडून कर्ज घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.