आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:महाराष्ट्र साहित्य परिषद ; मसाप जुळे सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी पद्माकर कुलकर्णी

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी पद्माकर कुलकर्णी यांची तर कार्याध्यक्षपदी सायली जोशी यांची बिनविरोध फेरनिवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर पानगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शाखेच्या नूतन कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी पदाधिकारी निवडण्यात आले.

उपाध्यक्षपदी श्रीकांत कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे, सह कार्यवाह रामचंद्र धर्मसाले, कोषाध्यक्ष आनंद देशपांडे , कार्यक्रम प्रमुख संदीप कुलकर्णी , युवा प्रमुख सचिन चौधरी , महिला विभाग प्रमुख रोहिणी कुलकर्णी आणि प्रसिद्धी प्रमख संतोष पवार यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर पानगावकर यांनी शाखेच्या पंधरा कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये अचला राचर्ला, यशवंत बिराजदार, डॉ. माधुरी भोसले, नयना देशपांडे, प्रशांत जोशी यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून प्रा.ए.डी.जोशी, डॉ.माधवी रायते यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर पानगावकर यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...