आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलनाचा इशारा:वाढीव वीज बिलाविरोधात महराष्ट्र शेतकरी संघटनेचा आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा

पापरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी,व्यावसायिकांनी, जनतेने एक रुपयाही वीज बिल भरू नये, मुख्यमंत्र्यांनी,उप मुख्यमंत्र्यांनी वीज बिल वसुलीला पायबंद घालावा अन्यथा ऊर्जा मंत्री यांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात येईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी या संदर्भात लक्ष घालावे अन्यथा महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटने मार्फत आझाद मैदान मुंबई येथे या संदर्भात न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांनी सोशल माध्यमात वरील आशयाचा आपला एक व्हिडिओ प्रसारित करत दिला आहे.

देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे सर्व शेतकरी,व्यावसायिक,व सर्व सामान्य जनता आर्थिक अडचणीत आली आहे,अशात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पाठीमागे शब्द दिला होता की घरगुती,शेती पंपाचे ,व्यावसायिक,उद्योगाचे वीज बिल १००युनिट पर्यंत माफ करू, मात्र त्यांनी तसे न करता आता २० तारखेपासून वीज बिल भरणे सक्तीचे केले आहे. तसा आदेश त्यांनी दिला आहे याचा मी सर्व प्रथम जनहित च्या वतीने निषेध करतो. तसेच शेतकरी मागील एक दीड महिण्याखाली झालेल्या अति वृष्टीने शेतकरी आयुष्यातून उठला आहे. जमिनीतील पिके, माती वाहून गेली आहे, महाविकास आघाडी सरकार मनमानी कारभार करत आहे, आम्हास वाटत होते.

महाविकास आघाडी सरकार मधील राज्यकर्ते आपला राज्य चालविण्याचा अनुभव कामी आणतील परंतु त्यांनी त्यांचा अनुभव गहाण ठेवला आहे, त्यांना सर्व सामान्य नागरिक,शेतकरी यांचे कांही देणे घेणे नाही,त्वरित त्यांनी सदर निर्णय मागे घेत १००टक्के वीज बिल माफ करावे अन्यथा वेळ प्रसंगी ऊर्जा मंत्री यांना जनहित शेतकरी संघटना जिल्हा बंदी करेन, तसेच मुंबई येथे आझाद मैदानावर ही आंदोलन लावू, जनतेने,शेतकऱ्यांनी दिलेल्या खुर्ची चा वापर जनतेसाठीच करावा मनमानी कारभार करू नये. याची नोंद मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्री यांनीही घेऊन वीज बिल वसुलीस पायबंद घालावा तसेच शेतकरी,व्यावसायिक यांनी एक रुपयाही वीज बिल भरू नये असे आवाहन ही भैय्या देशमुख यांनी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...